मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अडचणीत काही करता कमी होताना दिसत नाही. पक्षफुटीनंतर शिंदे गटाने शिवसेनाच्या चिन्हावर दावा ठोकल्याने निवडणूक आयोगाने धनुष्यबाण तात्पुरते गोठविले. यानंतर निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिले आहे. परंतु, मशाल चिन्हावरुनही आता नवा वाद उभा राहीला आहे.
उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांच्या संघर्षामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवून पर्यायी चिन्ह दिले आहे. ठाकरे गटाला मशाल व शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. परंतु, मशाल चिन्हावर आता समता पार्टीने दावा केला आहे. यासंदर्भात समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला ई-मेल केला आहे.
समता पार्टीच्या दाव्यानुसार, 1994 पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे चिन्ह आहे. ठाकरेंची मशाल ही आमच्या पार्टीच्या चिन्हासारखीच दिसत आहे. मतदान यंत्रावर ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये चिन्ह असल्याने दोन्ही चिन्ह सारखीच दिसू शकतात. यामुळे आता उध्दव ठाकरेंसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, 1994 समता पार्टी या पक्षाची स्थापना दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती. 1996 साली समता पार्टीला मशाल चिन्ह देण्यात आलं. मात्र, 2004 मध्ये या पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली. तरीही समता पार्टी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.