राजकारण

आज समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

Published by : Siddhi Naringrekar

आज समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. समरजीत घाटगे यांच्यासह भाजपचे 18 माजी नगरसेवकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचं पक्ष प्रवेश होणार आहे. दुपारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.

या पक्षप्रवेशावेळी समरजीत घाटगे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समरजीत घाटगे यांच्या प्रवेशामुळे कागलमधील राजकीय समीकरणं बदलणार आहे. या समरजीत घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कागल शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Mahayuti Report Card | महायुतीने रिपोर्ट कार्डमधून मांडला अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा

Lawrence Bishnoi Munawar Faruqui: स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर? काय आहे कारण...

'महायुतीच्या रिपोर्टकार्डला, महाराष्ट्र डिपोर्टकार्ड नाव देईल'आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Latur Crime| पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपीनं पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका; म्हणाले...