राजकारण

दादा, वाह रे लॉजिक! छगन भुजबळांवरुन राष्ट्रवादीचा अजित पवारांना सणसणीत टोला

राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर अजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले आहे. आता जरा वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, आता तुम्ही थांबणार आहात की नाही, तुम्ही आशीर्वाद द्याना, असे अजित पवार यांनी म्हंटले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

2 मे ला शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा मी कमिटी करतो सर्व प्रमुख बसा आणि सुप्रियाला अध्यक्ष करा आम्ही तयार झालो. त्यानंतर मी राजीनामा मागे घेतो बोललं, मग दिलाच कशाला, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. मी सुप्रियाशी बोललो, ते हॅप्पी आहे त्यांचा हट्ट आहे. असला कसला हट्ट. 82-83 वय झाले आहे कुठेतरी थांबले पाहिजे. पुढच्या पिढीला जबाबदारी दिली पाहिजे. एखादा माणूस रिटायर का होत नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना रिटायर होण्याचा सल्ला दिला होता.

सक्षणा सलगरांचा टोला

यावरुन सक्षणा सलगर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. व्हॉटसअ‍ॅपच्या स्टेटसच्या माध्यमातून सक्षणा सलगरने अजित पवारांना लक्ष्य केले. दादा, पवारसाहेबांचे वय झाले म्हणून त्यांनी कुठेतरी थांबले पाहिजे आणि छगन भुजबळ यांना वयाच्या 75 व्या वर्षात याच दादांनी मंत्री केले पाहिजे. वाह रे लॉजिक, असा टोला सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

दरम्यान, अजित पवार कालच्या बैठकीत मला पण बोलतां येत बोलावे लागेल. वरिष्ठ म्हणतात की निवडूनच कसे येतात ते पाहतो. ज्यांनी तुम्हाला साथ दिली. त्यांच्यासाठी ही भाषा. केंद्र सरकार राज्य सरकार एक मताचे असले तर केंद्राचा निधी येतो कामे होतात, असेही त्यांनी म्हंटले होते.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result