भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट घेऊन हा पक्षप्रवेश केला जाणार आहे.साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवली आणि जिंकलीही होती.
गावचे सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे त्यांच्याकडे आहेत. आज सोमवारी सायंकाळी मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर पाचपुते यांच्यावर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातही काका-पुतण्याचे राजकारण सुरू आहे. काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळविला.
साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकली. संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी याबद्दल ट्विट केलं आहे.
साजन पाचपुते कोण आहेत?
साजन पाचपुते हे बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. तसेच काष्टी तालुक्यातील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे देखील त्यांच्याकडे आहे. साजन पाचपुते यांचे खासदार संजय राऊत यांचे चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती.