किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट सोमैया यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचं प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन सावंत म्हणाले की, आज देशामध्ये दोन कायदे आहेत एक भाजपासाठी आणि एक इतरांसाठी हे वेळोवेळी स्पष्ट होते. या व्हिडिओ प्रकरणी तो व्हिडिओ खरा आहे की खोटा हे अजून त्या चौकशी समितीने सांगितले नाही आहे. जर पत्रकारांवर अशा प्रकारची कारवाई केली जात आहे तर ती भाजपाची हुकूमशाहीची मानसिकता दर्शवते. याचा आम्ही निषेध करत आहोत. तात्काळ हा गुन्हा मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे. असे ते म्हणाले.