किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन अहिर म्हणाले की, हा अत्यंत आक्षेपार्ह प्रकार आहे. लोकशाही मराठीने ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर स्वत: किरीट सोमैया यांनी मागणी केली आहे गृहमंत्र्यांकडे की या सर्व गोष्टी तुम्ही तपासून पाहा. त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो त्यांच्या मागणीनुसार चौकशी व्हावी. प्रत्येकाची प्रायव्हसी असते. कुणी कसे वागावे हा त्यांचा भाग आहे. यावर जर आंदोलन होणार असतील तर आम्ही रोखण्याचे काम करणार नाही. असे ते म्हणाले आहेत.