मुंबई : राज्यसभेतील फुटलेल्या मतांविषयी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज टीकास्त्र सोडले. फाटाफुटीच राजकारण याआधीही शिवसेने पाहिले आहे. परंतु, शिवसेना प्रमुख म्हणातात, मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी टीका केली आहे. ते शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणतात. मी उद्याची चिंता करत नाही. हारजीत होत असते. तरी आपण जिंकणारच आहोत. राज्यसभेत एकही मत फुटलेल नाही. फुटलेल्यांचा अंदाज लागलेला आहे, त्याचा लवकरच खुलासा होईल, असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होये आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय.
नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले. मला राज्य पाहिजे पण कारभार जमणार नसेल तर तुम्ही नालायक.
सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली. कारण त्यांचे काम मी बघितले आहे. आमशा पाडवी नंदुरबार सेथील असून हा परिसर सर्व आदिवासी वाड्या-वस्त्यांचा आहे. शिवसेनेतून आदिवासी आवाज म्हणून आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली. तर सचिन आहिरही चांगले काम करत आहे. सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांची टेस्ट घेऊनच त्यांना नंतरच उमेदवारी दिली आहे, असेही स्पष्टीकरण उध्दव ठाकरे यांनी दिले.