देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने आज १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले आहे की, टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पुण्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भव्य मंडप, पायघडय़ा वगैरे घातल्या आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आपले पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चा, अभिषेक, आरती वगैरे करणार आहेत. पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसब्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे.श्री. शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘ इंडिया फ्रंट ‘ च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे .
तसेच नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात . देवा , दगडूशेठ गणराया , तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा ! पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी , गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन !मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते; पण टिळक कुटुंब हे बरेचसे भाजपमय झाले. पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते परहस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे.