कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटने जगाचे टेन्शन वाढवले आहे. देशातही गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सामनातून राजय सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवित सुटले आहेत आणि त्यापुढे निप्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. 'कोरोना जोमात व सरकार कोमात' अशी ही अवस्था आहे. कोविडच्या नवीन संकटापासून वाचवण्यासाठी जनतेला कोणी वाली आहे काय?जेएन-1' या नवीन व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे शुक्लकाष्ठ पुन्हा एकदा मागे लागले आहे आणि मायबाप सरकार मात्र निवडणूक व्यवस्थापनात मश्गुल आहे. कोरोनाच्या वाढत्या गतीपेक्षाही सरकारला सत्तेची फिकीर आहे. गावोगाव पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचारयात्रा सुरू आहे.
कोविड - 19 या विषाणूच्या जेएन-1 या नवीन व्हेरियंटने आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात दर तासाला सरासरी 29 जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीची ही गती धोकादायक आहे. मात्र राज्य सरकारांसह केंद्रीय सरकार व सत्तारूढ पक्षाला निवडणूक ज्वराने झपाटले आहे. महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढत असतानाच कोरोनाच्या संकटानेही पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तापमानाचा पारा खाली उतरल्यामुळे देशभरातच कोविडच्या विषाणूंसारखे पोषक वातावरण तयार झाले आहे.
सत्तारूढ पक्षाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तमाम नेते ज्या पद्धतीने 24 तास इलेक्शन मोडवर आहेत ते पाहता प्रचंड वेगाने पसरत चाललेल्या कोविडच्या नव्या संकटाकडे लक्ष देण्यास या नेतेमंडळींकडे फुरसत आहे तरी कुठे? नाही म्हणायला आठवडाभरापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतर्कतेचा इशारा दिला. कोरोनामुळे देशभरात मृत्युमुखी पडले. प्रारंभिक काळात केलेले दुर्लक्ष व जनतेच्या सुरक्षेपेक्षाही राजकारण व निवडणूक सभांना दिलेले महत्व यामुळेच कोरोनाचे संक्रमण झपाटयाने वाढले. आताही तेच घडते आहे. 'जेएन-1' या नवीन व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे शुक्लकाष्ठ पुन्हा एकदा मागे लागले आहे आणि मायबाप सरकार मात्र निवडणूक व्यवस्थापनात मश्गुल आहे. कोरोनाच्या वाढत्या गतीपेक्षाही सरकारला सत्तेची फिकीर आहे. गावोगाव पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचारयात्रा सुरू आहे. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवीत सुटले आहेत आणि त्यापुढे निष्प्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. असे सामनातून म्हटले आहे.