मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरुन आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनीही मत व्यक्त केले आहे. लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या की, हा व्हिडीओ खरं की खोटं तपासून कारवाई होणे गरजंचं आहे. लोकप्रतिनिधीचं अशा पध्दतीने व्हिडीओ येणं हे अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहेत. किरीट सोमय्या प्रसिध्द व्यक्ती आहे. त्यांनी अनेक भ्रष्ट्राचार काढले आहेत. अशा पध्दतीचे व्हिडीओ येत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पहिजे असं माझं मत आहे. या व्हिडीओची याची शहनिशा करुन कारवाई होणं गरजेचे आहे.
सोमय्या महत्वाचे नेते आहेत म्हणून लोकप्रतिनिधींना हे शोभणारं नाही. लोकप्रतिनिधी जेव्हा समाजात काम करत असतो त्याने त्या चौकटीत करणे महत्वाचे असते. असे व्हिडीओ समोर येणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे थांबवावं. ही नैतिक जबाबदारी असते, असेही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हंटले आहे. तसेच, ही व्हिडीओ मॉर्फ आहे का नाही? हे तपासून जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.