राज्यात राजकीय घडामोडी सुरु असताना, अशातच सत्तांतरानंतर भाजप, शिंदे आणि मनसेची युती होईल अशी चर्चा सुरु असताना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे सुद्धा नवनवीन कामानिमित्त भेट घेत आहेत. याभेटींमुळे देखील चर्चांना वेग येत आहे. त्यातचा नुकताच मनसे आमदार राजू पाटील यांनी चर्चेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे. मात्र, केंद्रीय रामदास आठवले यांनी मनसे सोबतच्या युतीबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि मनसेच्या युतीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले असले तरी राज ठाकरे NDA मध्ये येणार नाहीत. आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही आहे. मुंबई महापालिकेवर RPI, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही. असे खळबळजनक विधान रामदास आठवले यांनी यावेळी केले.
समीर वानखेडे यांनी घेतला रामदास आठवलेंची भेट
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्याभेटीवर बोलताना आठवले म्हणाले की, त्याच्यावर अन्याय झाला असल्याची भावना सांगितले आहे.