लोकसभा निवडणुकीसाठी विजय शिवतारे यांची बारामती मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं बोललं जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतारे यांनी भेट घेतली. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. उद्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार असून मी माझी भूमिका स्पष्ट करेन, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिलीय.
त्यातच विजय शिवतारे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, परंतू लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करुन जे जे मला आता मुख्यमंत्री महोदयाने समजावलं महायुतीबाबतचे ती जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांसमोर मांडणार. आणि मग सगळ्यांचे काणोसा घेऊन काय त्यांचं मत आहे त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांचा मला जर गरज वाटली तर मुख्यमंत्री महोदयाबरोबर उद्या परत गाठभेट करुन ते सांगितलं जाईल.
मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही म्हणून सर्व ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते अतिशय शक्तीशाली होते. त्या सगळ्यांना उद्या बोलवलं गेलं आहे. सुर नरमाईचा दिसतो यावर उत्तर देताना विजय शिवतारे म्हणाले की, आता जास्त बोललं की तुम्ही परत तेच शब्द दाखवणार. बैठकीत अजित दादांनी काय सांगितलं यावर बोलताना शिवतारेंनी हात जोडले असे शिवतारे म्हणाले.