बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बंद कशासाठी आहे की जी घटना बदलापूरला झाली हे त्याच्या विरोधात निषेध म्हणून हा बंद पुकारला आहे. त्या विरोधात पण सदावर्ते जात असतील, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनीच फोन केला असेल ए चल आता तुझी मदत लागणार आहे जा कोर्टात. त्यामुळे हे जे काही आहे ना ते मिलीभगत आहे याचे करता-धरता देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भाजप आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद विरोधात काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.