रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली आहे. यावेळी सणसवाडी येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी एक दिवसाचा अन्नत्यागाचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण एक दिवस अन्नत्याग करणार आहे. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आपण रोज 18 ते 20 दिवस चालतोय. अशा परिस्थितीतही आपण अन्नत्याग करणार आहोत. असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. 45 दिवसांचा हा प्रवास असणार असून ७ डिसेंबरला नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे.
यासोबतच त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून #युवा_संघर्ष_यात्रा सुरू असताना उद्या (गुरुवार) एक दिवस मी अन्नत्याग करत आहे. असे रोहित पवार म्हणाले.