Rohit Pawar | Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर रोहित पवार म्हणाले, वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला...

102 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे

Published by : Sagar Pradhan

मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आता राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) यांच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी जबरदस्त ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या प्रचंड होत आहे.

काय केलं रोहित पवार यांनी ट्विट?

संजय राऊत यांना जमीन मंजूर झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी एक वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये असं दिसते की एक वाघ पिंजऱ्यातून बाहेर येतो. त्यावर त्यांनी लिहिले की, #सत्यमेवजयते! सोबतच संजय राऊत यांना त्या ट्विटमध्ये पवार यांनी टॅग केले आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते. याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...