शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली. बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते.
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांची भेट घेणार. ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करणार. आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिलेली आहे. जे कागदपत्र मागितलेत ते आजपर्यंत दिलेत. बलाढ्य शक्तीविरोधात आवाज उठवल्याने कारवाई. ईडीने जी माहिती मागितली आहे ती दिली आहे. अधिकारी त्यांचं काम करतात. चूक केली नसेल तर घाबरायचं काम काय? पळून जाणार नाही लढत राहणार. असे रोहित पवार म्हणाले.