कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन करत आहेत. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आंदोलनासाठी बसले आहेत. आमदार जयंत पाटील यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला तिथे गेले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, रोहित पवार यांनी तिथं आंदोलन किंवा उपोषण करू नये. तसेच आपलं म्हणणं, सभागृहात येऊन मांडावे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. तेथील पावित्र्य राखलं पाहिजे. तिथं आंदोलन किंवा उपोषण करायचं नाही, हे ठरलं आहे.