राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिर्डीत 2 दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी आमदार रोहित पवार गैरहजर राहिले आहेत. त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय @PawarSpeaks
साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा @Jayant_R_Patil साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू असे रोहित पवार म्हणाले.
यावर जयंत पाटील यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमदार रोहित पवार बाहेरच्या देशात दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते आजच्या शिबीरासाठी गैरहजर आहेत.