मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. आता मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा आयोजित केल्या जातात. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात.
यातच आता रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खळबळजनक दावा केला आहे. मराठा आरक्षणसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील राजकारण प्रवेश करतील असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. मनोज जरांगे पाटील जानेवारीमध्ये राजकारणात येतील असंही रोहित पवार म्हणालेत.
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांनी कधीही राजकारणात जाणार नाही असं म्हटलं होतं. सातत्यानं राजकारण प्रवेशाच्या बातम्यांचा त्यांनी विरोध केला होता. पण आता रोहित पवारांनी जरांगे पाटलांच्या राजकारणातील प्रवेशाची थेट तारीखच जाहीर करुन टाकली आहे.
आता पुन्हा जरांगे पाटलांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरु झालीय. जरांगे पाटील एखाद्या राजकीय पक्षात जातील की स्वतःचा वेगळा पक्ष काढतील हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.