राजकारण

Rohit Pawar : आता दूधही गुजरातच्या हाताने पिण्याची वेळ या सरकारने महाराष्ट्रावर आणलीय

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार आहे. महानंदच्या संचालक मंडळानं एनडीडीबीच्या व्यवस्थापनाला हा प्रकल्प चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल डेअर डेव्हलपमेंट बोर्ड महानंद चालवणार असून त्यांचं मुख्यालय गुजरातच्या आणंदमध्ये आहे.

राज्य सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनडीडीबीच्या व्यवस्थापनाकडं महानंदचे अधिकार जाणार आहेत. एनडीडीबी ला महानंद देण्याऐवजी राज्यातील सक्षम सहकारी दूध संघास महानंदा चालवण्यास देण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, गुजरातच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या या नाकर्त्या सरकारमुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातमध्ये गेलेच पण आता सहकाराची जननी असलेल्या महाराष्ट्रातून #महानंद सारखी सहकारी संस्थाही गुजरातस्थित NDDB (राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ) ला चालवायला देऊन आता दूधही गुजरातच्या हाताने पिण्याची वेळ या सरकारने महाराष्ट्रावर आणलीय... #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र_माझा अशी दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्या या सरकारचा हा कारभार पाहिला तर खऱ्या अर्थाने हाच प्रश्न या सरकारच्या बाबतीत आज सामान्य माणसाला पडलाय.

ग्रामीण भागात शेती खालोखाल सर्वांत मोठं उपजीविकेचं साधन कोणतं असेल तर ते दूध व्यवसाय. या व्यवसायाला चालना देऊन त्याला पूरक धोरणं आखून ती राबवण्याऐवजी सहकारातली शिखर संस्थाच मोडीत काढली जात असताना जनता यांना माफ करणार नाही! कारण आता हा प्रश्न स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा बनलाय. एकेकाळी हाच महाराष्ट्र देशाला दिशा देणारा होता पण आज या निकामी सरकारमुळं मात्र महाराष्ट्र धर्मच धोक्यात आलाय. असे रोहित पवार म्हणाले.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी