राजकारण

हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून दोन समाजात वाद लावण्याचं काम; Rohit Pawar यांचा भाजपावर गंभीर आरोप

शरद पवार गटाचे नेते आमदार आमदार रोहित पवार विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावतीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

Published by : Siddhi Naringrekar

सुरज दहाट - अमरावती

शरद पवार गटाचे नेते आमदार आमदार रोहित पवार विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावतीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला,.यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागत भाजपवर गंभीर आरोप केले. लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून समाजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातोय. सामान्य लोकांचे मुख्य मुद्दे बाजूला राहतात. लक्ष दुसरीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि देवेंद्र फडणवीस सर्व रणनीतीच्या मागे आहे. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच मराठा आणि ओबीसी सोबतच हिंदू, मुस्लिम होण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जाईल असंही रोहित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही व आमचे मित्र पक्ष रस्त्यावर उतरतील,शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झालं मात्र खर्च वाढला, तर शरद पवार यांचा जातीचा खोटा दाखला व्हायरल करण्यात आला यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली,जो पवार साहेबांचा दाखला सोशल मीडियावर फिरत आहे. तो खरा नाही. पण भाजपा नेहमीच खोट्या गोष्टी पसरत असते. त्यांचं राजकारण करते. त्यांना असत्याचा मार्ग घेऊन सत्तेत येणे एवढाच कळतं, व सत्तेत आल्यावर त्यांना पावरचा उतमाद करणं एवढंच त्यांना कळत. सामान्य लोकांचे प्रश्न कळत नाही. तर अजित पवार व शरद पवार परत येतील की नाही तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे. मात्र अजितदादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहे असं जाणवत आहे.

भाजपला लोकनेता पटत नाही त्यांना त्यांच्या पक्षातला लोकनेता सुद्धा पटत नाही. लोकनेते ताकद भाजप कमी करते आणि तीच गोष्ट अजितदादा सोबत होत आहे. कारण गोपीनाथ मुंडे पंकजाताई मुंडे,आ. फुंडकर तावडे,एकनाथ खडसे यांची ताकद भाजपने कमी केली आहे. असाही टोला त्यांनी लगावला आहे. आमदार रोहीत पवार आपल्या परिवारासह यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड तुकोबा येथील शेतकरी कुटूंबासोबत दिवाळी साजरी करणार आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...