राजकारण

बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शिंदे गटातील नेत्याने दिली माहिती; रोहित पवारांनी सांगितले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली होती. याबाबत हायकोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे. या घडामोडींमध्ये रोहित पवारांनी सूचक पोस्ट केली आहे. माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे, असे रोहित पवारांनी म्हंटले आहे.

माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं, असे रोहित पवारांनी म्हंटले आहे.

केवळ राजकीय द्वेष या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत. त्यामुळं भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास त्यांनी जाहीर केला आहे.

दरम्यान, बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने रोहित पवार यांना नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना दिली होती. याविरोधात रोहित पवारांनी हायकोर्टात धाव घेतली असून दिलासा मिळाला आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला आदेश दिले आहेत. याबाबत सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार होणार आहे.

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद