राजकारण

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस नव्या युगातील जनरल डायर; रोहित पवारांची टीका

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, जर तुमच्याकडे पैसा असेल, दबाबतंत्र असेल तर पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. त्यामुळे काही लोक स्वत:ला चाणक्य समजतात, अभिमन्यू समजतात. त्यांना एवढेच सांगायचं आहे. विचार टीकवायला, विचार जपायला अक्कल लागते.

आज देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरले तरी त्यांच्या पक्षाला 10 - 20 हजाराचे नुकसानच होते. त्याचे मुख्य कारण असे की, द्वेषाचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. देवेंद्र फडणवीसांकडे काय असेल तर सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा पाठिंबा आहे. त्याच्यावरच धमक्या देऊन, गुंडशाही करुन, दबावतंत्र करुन जे काही पार्टी आणि कुटुंब ते फोडत आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब स्वत:ला चाणक्य आणि अभिमन्यू समजत असले तरी लोकांमध्ये चर्चा एवढीच आहे की, आजच्या नवीन युगातलं जनरल डायर कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे पवार साहेब जे बोलतात ते खरं आहे. पक्ष बांधायला, विचार जपायला अक्कल आणि कष्ट लागतात जे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांमध्ये आहे. असे रोहित पवार म्हणाले.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान