मुंबई : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत अटल बिहारी वाजपेयी यांचे अंधेरा छटेगा, कमल खिलेगा हे वाक्याचा उच्चार केला व वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सत्तावादी बनलेल्या भाजपास सत्यवादी बनण्यासाठी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा, अशा खोचक शुभेच्छा रोहित पवारांनी भाजपला दिल्या.
स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, स्व. प्रमोद महाजन, स्व. मुंडे यांच्या कष्टाने बहरलेल्या पण आज सत्तावादी बनलेल्या भारतीय जनता पक्षास सत्यवादी बनण्यासाठी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा, अशा खोचक शुभेच्छा रोहित पवारांनी भाजपला दिल्या.
तसेच, सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए, स्व. अटलजींच्या याच विचारांवर एकेकाळी चालणारी पण आज विचलित झालेली भाजपा येत्या काळात लोकशाही विचारांना जपण्याचा प्रयत्न करेल, ही अपेक्षा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
आपला वैचारिक लढा हा कायम राहील. परंतु, लोकहितासाठी एकत्र येण्याची गरज असेल तिथं एक नागरिक म्हणून नक्कीच सहकार्य राहील, असेही रोहित पवारांनी म्हंटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या एकूण वाटचालीवर प्रकाश टाकला. पहिले अधिवेशन झाले. त्यात आपले नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पश्चिम तटेवरच्या साक्षी ठेवून सांगितले होते अंधेरा छटेगा, कमल खिलेगा. तेव्हा कुणाला विश्वास नव्हता. पण, इंदिरा गांधी यांची हत्या झाली राजीव गांधी लाटेत निवडून आले. तेव्हाही भाजपाचे २ खासदार आले. आम्हाला पर्याय म्हणतात कोण ज्यांचे दोन निवडून आले. त्यानंतर ६ वर्षे भाजपाचे सरकार आले. त्यानंतर पुन्हा १० वर्षे काँग्रेस सरकार पाहिले. नंतर नव भारताचे नव सरकार मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाहिले, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.