राजकारण

Belgaum Municipal Election Results 2021 | बेळगाव महापालिकेत भाजपा आघाडीवर तर महाराष्ट्र एकीकरण समिती 4 जागांवर विजयी

Published by : Lokshahi News

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

वॉर्ड क्रमांक 14 मधून म. ए. समितीचे शिवाजी मंडोळकर विजयी झालेत. विजयी उमेदवार काँग्रेस- 4 महाराष्ट्र एकीकरण समिती- 1 अपक्ष- 2 भाजप- 4 एमआयएम- 1 , वॉर्ड क्रमांक 1 मधून इकरा मुल्ला विजयी वॉर्ड क्रमांक 12 अपक्ष उमेदवार मोदीमसाब मतवाले विजयी वॉर्ड नंबर 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडूळकर विजयी वॉर्ड नंबर 15 मधून भाजपच्या नेत्रा भगवती विजयी वॉर्ड क्रमांक 19 मधून अपक्ष उमेदवार रियाज अहमद किल्लेदार विजयी वॉर्ड क्रमांक 21 मधून भाजपच्या उमेदवार प्रीती कामगार विजयी वॉर्ड क्रमांक 40 भाजप उमेदवार रेश्मा बसवराज कामकर विजयी या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले. दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवारांनी निवडणूक लढवली. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडले. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 50. 41 टक्के मतदान झाले. 1 लाख 13 हजार 396 पुरुष तर 1 लाख 3 हजार 764 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत 58 प्रभागांसाठी मतदान झालं असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणारं असून दुपारी 12 पर्यत सर्व चित्र स्पष्ट होईल. मुळात मतदानाची टक्केवारी घसरल्याने निकालाकडे सर्वांच लक्ष आहे. वार्ड पुनर्रचना, अनेकांची नावे यादीतून वगळली असल्याने निकालानंतर ही आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या फेरीनंतर

भाजप :8
समिती:3
Mim :1
काँग्रेस :4
अपक्ष :4

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल