राजकारण

सिव्हिल सर्जनला हटवा, पिडब्लूडीचे इंजिनिअर निलंबीत करा, मग चौकशी करा; बाळा नांदगावकर

Published by : Lokshahi News

संतोष अव्हारे | अहमदनगर | जिल्हा शासकीय रुग्णालयाला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत अकरा लोकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. यासंदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देत दुर्घटना झालेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी सध्या कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्याशी एकूण आग प्रकरणा  संदर्भात चर्चा केली त्यावेळी पाहणी दरम्यान अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सिव्हिल सर्जन यांच्याशी झालेली चर्चा या अनुषंगाने असे दिसून येत आहे की याठिकाणी फायर ऑडिट बाबत माहिती असतानाही, असणाऱ्या तांत्रिक दुरुस्त्या या केल्यागेल्या नाहीत त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तांत्रिक आणि बांधकामाची जबाबदारी संबंधित इंजिनिअर यांनी पार पाडल्याचे दिसून येत नसल्याचे प्राथमिक दिसत आहे त्या अनुषंगाने आता जर या दुर्घटनेची चौकशी होत असताना जिल्हा रुग्णालयाचे विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक हेच त्या पदावर कार्यरत असतील तर ही चौकशी निर्धोक होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्या पदावरून हटवण्यात आलं पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ही संबंधित इंजिनियर असतील त्यांनाही तात्काळ निलंबित केले पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सलमाच्या जीवावर का उठला आहे लॉरेन्स बिश्नोई?

Manushi Chhillar: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा कमाल लूक; एकदा पाहाच

Shrikant Shinde PWD अधिकाऱ्यांवर संतापले | Marathi News

Atul Parchure Passed Away : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

Shantanu Naidu: रतन टाटांची सावली म्हणून ओळखला जाणारा त्यांचा जिवलग, कोण आहे शंतनू नायडू?