Amruta Fadnavis Team Lokshahi
राजकारण

Amruta Fadnavis : 'देवेंद्र अकेला नहीं है, पुरी कायनात उनके साथ है'

राज्यसभेच्या निकालानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) शिवसेनेचा (Shivsena) पराभव करत तीनही उमेदवारांना विजयी केले आहे. यासाठी भाजपला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील बुधवार पेठ भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. सर्व अपक्ष आमदारांना धन्यवाद. सुंदर विजय झालेला आहे. हा विजय सत्याचा आहे. सत्याच्या बाजूने सगळे आहेत याचा मला आनंद आहे. हे कर्तृत्व आणि नेतृत्वाचे यश आहे. भाजप सगळ्या गोष्टी स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवते. रडीचा डाव भाजप नाही महाविकास आघाडी खेळत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

तर, आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंनी स्वतःला झोकून देत काम केलं नाही. त्यांनी फक्त टोमणेबाजीचे राजकारण केले आहे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे. देवेंद्र अकेला नहीं है पुरी कायनात उनके साथ है. तसेच, राज्यसभा झाली आता विधान परिषदेचा निकाल यात दुमत नसेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे ते लोक बघत आहेत आणि ते उघड आहे. आजचा विजय सेनेला धडा नाही. पण, इथून पुढे आता शिवसेनेला धडे सुरु होतील. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच मी बोलले होते की आपला राजा आपल्या प्रजेसाठी किती ठीक आहे. आता प्रत्येक माणूस बोलतोय तर मला बोलण्याची गरज नाही.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result