अमरावतीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत रवी राणांनी एक वक्तव्य केलं आहे. रवी राणा म्हणाले की, दिवाळीनंतर महिलांना 1500 रूपयांच्या जागी 3 हजार रूपये केलं पाहिजे. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की, 1500 रुपयांचे 3 हजार रुपये झाले पाहिजे. हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भरभरुन त्यांना तुम्ही आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिलेला नाही तर मी तुमचा भाऊ आहे तर ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईन. असे रवी राणा म्हणाले.
यावर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाले की, खरं त्यांचा मूळ स्वभाव समोर आलेला आहे आणि दोन्ही दाम्पत्य ब्लॅकमेलर आहे हे समजून येत आहे. काही मजाकमध्ये केलं नाही. जे रोज तुम्ही करता तेच तुमच्या जीभेवर येत असते. आज त्यांचा स्वभाव ब्लॅकमेलींगचा आहे हे सिद्ध झालेलं आहे.
तसेच ते म्हणाले की, महिलांसाठी योजना करायच्या मतांसाठी त्या त्याठिकाणी वापरायच्या आणि मत झाल्यानंतर स्वत:च म्हटले की ते परत घेणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की, एकवेळ इलेक्शन झालं की योजना ही बंद करण्याच्या मार्गावर हे नक्की जातील हे आज सिद्ध झालेलं आहे. कॅश फॉर वोटचं हे एक उत्तम उदाहरण आहे. याठिकाणी ही गोष्ट सहन न होणारी आहे. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.