राजकारण

Ravi Rana : राऊतांनंतर शिवसेनेचा 'हा' बडा नेता तुरुंगात जाणार

आमदार रवी राणांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप

Published by : Team Lokshahi

सूरज दहाट | अमरावती : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच, शिवसेनेच्या (Shivsena) आणखी एका बड्या नेत्याला जेलमध्ये जावे लागणार, असे भाकीत वर्तविले आहे.

रवी राणा म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करते आहे. अनेकदा संजय राऊत यांना देखील बयान नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. संजय राऊत यांनी अनेक भ्रष्टाचार केलेत त्याचे धागेदोरे सुद्धा मोठे आहेत आणि ते अनिल परब यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल, असे दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्याची मोठी जबाबदारी संजय राऊतांवर होती. उद्धव ठाकरेंना भाजपकडून बाहेर काढून काँग्रेसमध्ये युती झाली आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं यामागे सुद्धा संजय राऊत होते, असेही रवी राणा यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात ईडी नावाचं वादळ घोंघावतंय. त्या वादळाच्या केंद्रस्थानी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. आज त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंसाठी यंदा वरळी कठीण? Vidhan Sabha

मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला