मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसोबत नवी मुंबईत जाऊन चर्चा केली पाहिजे. मराठा आरक्षणावर तोडगा नाही काढला तर महाराष्ट्रात हाहाकार उडेल. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहित नाही. त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या गेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायलय आणि निवडणूक आयोग काम करत आहेत. आमचा विरोध हा हुकूमशाहीला आहे संविधान नहीं हम करे सो कायदा संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करीत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहित नाही. त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत हे खोके वाटप करायला ठीक आहे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे.
भाजपाची 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना दंगली घडविण्याची ही कटकारस्थान आहेत. हिंदू मुसलमानांच्या दंगली करून यांना 400 पार नारा दंगलीच्या आगीतून आला आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी जागावाटप बद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, जवळजवळ दृष्टीपथावर तोडगा आलेला आहे. आठ ते नऊ तास आम्ही काल चर्चा केली. आमच्यात कुठलीही मतभेद नाहीत. 30 तारखेला वंचित हि आमच्या चर्चेत सहभागी होईल. चेहरा पक्ष आणि खाली असलेल्या कार्यकर्त्यांचे केडर या तीन सूत्रांचा वापर आम्ही जागा वाटपा संदर्भात करत आहोत. मुंबईबाबत नंतर चर्चा करणार आहेत.