सध्या राज्यात राजकारण विविध कारणावरून प्रचंड तापले आहे. त्यातच हर हर महादेव चित्रपटावरून वादंग पेटले होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणात नुकताच जामीन मिळाली आहे. परंतु, आव्हाड यांच्यावर आता गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरूनच आता राजकीय वातावरण चांगेलच तापलेले असताना, याच संपूर्ण प्रकरणावर आता भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी पत्रकार परिषद घेत मत मांडले आहे.
काय म्हणाल्या रीधा रशीद?
आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना त्यावर बोलताना तक्रारदार रशीद म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी मला दोन्ही हाताने धरुन पुरुषांवर ढकललं, या आरोपाचाही राशीद यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे मी अवघडले होते, असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध केला.
‘मी भाजपची जरी असले, तरी भाजप म्हणून मला कमी लोकं ओळखतात, माझी खरी ओळख एक सामाजिक संस्था चालवणारी महिली, अशी आहे’, असं रीदा राशीद यांनी यावेळी म्हटलं. राष्ट्रवादीकडून तुमचे जुने व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हंटल्या की, आता ते हे सर्व बोलणार पण या संबंधी मी नंतर सविस्तर बोलेल असे उत्तर यावेळी त्यांनी दिले.
पुढे त्यांना विचारण्यात आले काही राजकीय लोक म्हणता आहेत की हा साधारण धक्का होता. यामध्ये गुन्हा दाखल करण्यासारखं काही नाही. त्यावर त्या म्हणाल्या की, धक्का कसा होता हे कोण ठरवणार हे मी ठरवणार मला पकडलं मला ढकललं. जे माझ्यासोबत घडल तेच मी सांगितले. असे रीधा रशीद माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.