राजकारण

Ramraje Naik Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर 'या' दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. यातच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रामराजे नाईक निंबाळकर काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

रामराजे नाईक निंबाळकर 14 ऑक्टोबरला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत असून इंदापूरातील कार्यक्रमात शरद पवार यांनी फलटणमधील 14 तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिल्याचे पाहायला मिळाले.

फलटणमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत रामराजेंचा पक्षप्रवेश होणार आहे. फलटणमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडणार आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत संजीवराजे निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणसुद्धा हाती तुतारी घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Manoj Jarange | आचारसंहिता लावुन मराठ्यांचं वाटोळं केलं- मनोज जरांगे संतापले

Baba Siddique हत्याप्रकरणातील चौथा आरोपी पकडला

Maharashtra Vidhansabha Election Date|महाराष्ट्राच्या विधानसभेची तारीख जाहीर | #election2024

Vidhansabha Elections |आचारसंहिता लागू, फडणवीस, अजित पवार, जरांगे यांच्या प्रतिक्रिया समोर

Maharashtra Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान, 23 तारखेला निकाल