अजित पवार २ जुलै रोजी पक्षातील इतर आमदारांसमवेत सरकारमध्ये सामील झाले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. यातच आता ज्येष्ठ आमदार व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.
साताऱ्यात माध्यमांशी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, अजित पवारांना योग्य वेळी मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. १९९९ ला आम्ही शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठीची स्वप्नं पाहिली होती. त्याच पद्धतीने आता अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचं स्पप्न आम्ही पाहातो आहोत. असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.