मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. यावरच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
रामदास कदम म्हणाले की, मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. राज ठाकरे यांचा प्रस्ताव घेऊन मी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. पण आमच्या उद्धव ठाकरे यांच्या घरच्या माणसांना दोन भावांना एकत्र आणायचं नाही. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊच शकत नाहीत. काळ्या दागडावरची कोरलेली रेघ आहे. असे रामदास कदम म्हणाले.