राजकारण

रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; कीर्तीकरांसोबतच्या वादावर तोडगा निघणार?

गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे दोन्ही नेते शिंदेंसोबत सत्तेत दाखल झाले. मात्र, आता शिंदे गटातल्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याने अनेक अंतर्गत गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे दोन्ही नेते शिंदेंसोबत सत्तेत दाखल झाले. मात्र, आता शिंदे गटातल्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याने अनेक अंतर्गत गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत. निष्ठावान कोण?, गद्दार कोण? यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच, गजानन कीर्तीकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर, आज रामदास कदमांनी मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतली आहे.

गजानन कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर कीर्तिकरांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होते. यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे रामदास कदमांनी म्हंटले होते. याआधीच गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तर, यानंतर आज रामदास कदम एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. या भेटीतील चर्चा अद्याप गुलदस्त्यात असली तरी या भेटीनंतर रामदास कदम आणि किर्तीकर यांच्यातील वाद संपणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काय आहेत आरोप-प्रत्यारोप?

ठाकरेंपासून वेगळे झालेल्या शिवसेना नेत्यांमध्येही आता संघर्ष निर्माण झाला आहे. गजाजन कीर्तीकर यांनी रामदास कदमांवर गद्दारीचा आरोप केला. रामदास कदमांनी काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकरांवर गद्दारीचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपांना कीर्तीकर यांनी एक पत्रक काढून उत्तर दिलं. 1990च्या विधानसभा निवडणुकीत मालाड विधानसभेतून उभं असताना आपल्याला पाडण्यासाठी रामदास कदमांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली होती, असं कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. तर, रामदास कदमांनी पलटवार करत गजानन कीर्तीकर पक्षासोबत गद्दारी करत आहेत. खासदारकीचा निधी कीर्तीकर मुलाला देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी