राजकारण

मंत्रीपदाचे आश्‍वासन दिले होते, पण अजित पवारांचाच विस्तार झाला; आठवलेंचा टोला

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. यामुळे मंत्री पदासाठी वेटिंगवर असलेल्या आमदारांचे सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

यवतमाळ : हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यामुळे मंत्री पदासाठी वेटिंगवर असलेल्या आमदारांचे सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. अशातच, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सरकारला टोला लगावला आहे. विस्तारात मंत्रीपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, अजित पवार यांचाच विस्तार झाला, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

रामदास आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. शिर्डीतून आपण स्वत: निवडणूक लढण्यास इच्छूक आहे. विधानसभा निवडणुकीत दहा जागांचा आग्रह राहणार आहे. तसेच, बाळासाहेब आंबेडकर आरपीआयसोबत आल्यास पक्षाची ताकद नक्कीच वाढेल. दोघांनी मिळून पक्ष चालविण्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रात व राज्यात भाजपच्या जागा वाढण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे. महायुती सरकारमध्ये पक्षाचे नाव घेतले जात नाही, असे म्हणत रामदास आठवलेंनी विस्तारात मंत्रीपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, अजित पवार यांचाच विस्तार झाला, असा टोला लगावला आहे.

दरम्यान, मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाही. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्‍न सुटणार नाही. जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. परंतु, जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रामदास आठवलेंनी जरांगेंना केला आहे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, त्याशिवाय जातींची टक्केवारी कळणार नाही. टक्केवारीनुसार आरक्षण मिळू शकेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result