राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच भाजपने त्याच पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात मिशन महाराष्ट्र सुरु केलं आहे. भाजपने विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्ल्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यावर बारामती दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आठवले?
बारामती बोलताना आठवले म्हणाले की, बारामतीची जागा ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आहे, पण आमचा निर्धार आहे तिथे जिंकून यायचे. बारामतीत शरद पवार यांची हार नको, पण आमचा विजय झाला पाहिजे, असे विधान आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
तुम्ही कुठली सेना मानता असा प्रश्न विचारल्यानंतर आठवले म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मानतो. आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मनात होतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेनेवर बोलताना केली.
सोबतच बोलताना आठवले म्हणाले की, भारतात आणलेले चित्ते मी बघितले नाहीत. पण, नॅशनल पार्कमधल्या चित्याला आम्ही अडप्ट adopt केले आहे. मी आणलेले चित्ते पाहायला जाणार आहे आणि मिळाले तर मी तिथून एक चित्ता घरी आणार आहे. असे विधान यावेळी त्यांनी केलं.