Money Laundering|Nawab Malik|Anil Desmukh team lokshahi
राजकारण

Rajya Sabha Election : अनिल देशमुख-नवाब मलिकांच्या जामिनाला ईडीचा विरोध; केलं 'हे' मोठं विधान

Published by : Shubham Tate

rajya sabha election : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या जामीन अर्जाविरोधात आपला विरोध नोंदवला आहे. खरे तर हे दोघेही आगामी राज्यसभा निवडणुकीत (rajya sabha election) मतदान करण्यासाठी एका दिवसासाठी तात्पुरता जामीन मागत होते. या संदर्भात ईडीने सांगितले की, कैद्यांना प्रतिनिधीद्वारे मतदान करण्याचा अधिकार नाही. 10 जून रोजी राज्यसभेच्या खासदाराच्या निवडणुका होणार आहेत. (rajya sabha elections ed opposes bail of anil deshmukh nawab malik says prisoners do not vote)

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना राज्यातील सहा जागांवर होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सोमवारी एका दिवसासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गेल्या आठवड्यात असाच अर्ज केला होता. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी नियुक्त केलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन्ही अर्जांवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी 8 जून निश्चित केली.

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग