राजकारण

...तर माझीही ईडी चौकशी करा; राजू शेट्टींचे सरकारला आव्हान, मी तयार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी वरून स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टींनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी वरून स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टींनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. फक्त विरोधक म्हणून ईडी चौकशी करू नका तर सर्वांचीच चौकशी करा, त्यात माझीही चौकशी करा, मी तयार आहे, असे खुले आव्हानही शेट्टी यांनी दिले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार आहे. चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा. फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका. यामध्ये माझी सुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका, असा टोलाही राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. मात्र स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकलंगले मतदारसंघात उमेदवार म्हणून लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्यकर्ते आणि राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकरी आत्महत्या संकटात अडकला असताना राज्यकर्त्यांकडून कोणतीही मदत किंवा विचारपूस शेतकऱ्यांची केली जात नाही. त्यामुळे आता या राज्यकर्त्यांच्या विरोधात शेतकरी आवाज उठवेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल