राजकारण

राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना टोला; काहींना पॉकेटमनी मिळावी म्हणून...

श्रीकांत शिंदेंच्या टीकेला राजू पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्याण : कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी नावापुढे आजी शब्दाऐवजी माजी शब्द लागणार नाही ना, अशी खोचक टीका श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांच्यावर केली होती. यावर राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकांना पॉकेटमनी मिळावा म्हणून घरच्यांच खात्यातून कामे दिलीत, असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.

राजू पाटील म्हणाले की, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही, मी देखील कुणाचं नाव घेतलं नाही. काही लोकांना पॉकेटमनी मिळावी म्हणून घरच्याच खात्यातून कामे दिलेली आहेत. त्यामुळे ते काम आणल्याचीही वलग्ना करतायत, कुठलंही काम छोटं नसतं गल्लीतलं काम केलं तरी ते जनतेसाठी असतं व तुम्ही बिल्डरांसाठी रस्ते बनवले ते जनतेचा सोयीसाठीच आहेत. कालच्या बोलण्यातून मार्ग दिसत होता तो उतरण्यासाठी ट्विट केलं, अशी टीका राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केली.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी या भागातील काहींना लोकसभेची स्वप्ने पडू लागली आहेत. स्वप्ने पाहण्यापूर्वी आपले काम, कर्तृत्व काय आहे हे पण एकदा तपासून पाहण्याची गरज आहे. अन्यथा, आपल्या नावापुढचा आजी शब्द जाऊन माजी शब्द लागण्याची अधिक भीती आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली होती.

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु