राजकारण

...इतकंही प्रशासनाला कळलं नाही का? 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राज ठाकरेंचा संतप्त सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात या रुग्णांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. येथे उपस्थित 12 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात या रुग्णांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. तर, राज ठाकरेंनी ट्विटरवरुन शिंदे-फडणवीस सरकारला परखड प्रश्न विचारत सल्ला दिला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का, असा परखड प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, अजित पवार आणि उध्दव ठाकरे यांनीही उपचाराधीन श्री सदस्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, हलगर्जीपणा झाल्यावरती काय घडू शकते हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. उन्हाळा भरपूर आहे आणि अशातच कार्यक्रमाची वेळ दुपारी निवडणे हे आयोजकांचा चुकलेले आहे. का घडलं, कोणी हलगर्जीपणा दाखवला कोणी दुर्लक्ष केले या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण, 14 कोटींचा बजेट होत, एवढी रक्कम खर्च केली सरकारणे तर अशा घटना घडायला नको होत्या, असा निशाणा अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला होता.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...