गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यावर आक्षेप घेत त्याच वेळी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करू असे जाहीर केले असून हा 'सामाजिक मुद्दा आहे, धार्मिक मुद्दा नाही' असे प्रतिपादन केले आणि आपला पक्ष या विषयावर मागे हटणार नाही, असे प्रतिपादन केले.अनेक राजकीय नेत्यांनी या वक्तव्यावर टीका सुद्धा केली आहे.महाराष्ट्रसह काशी (Kashi) मध्ये अजानच्यावेळी हनुमान चालीसा पठण करण्यात आलं आहे.
या सर्व प्रकाराने राजकीय वातावरण तापलं असताना देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 16 एप्रिल (April) रोजी पुणे (Pune) दौरा करणार आहेत. पुण्यात शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे महाआरती करणार असून त्याचबरोबर सामूहिक हनुमान चालीसा(Hanuman chalisa) पठण सुध्दा करणार आहेत.पुण्यातही मशिदींवरील भोंगे (Mosque loudspeaker) उतरवण्यासाठी मनसे आक्रमक होणार असून पुण्यातलं राजकीय वातावरण तापणार आहे.