Raj Thackeray - Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

टि्वटच्या माध्यमातून राज यांचा उद्धव यांच्यांवर निशाना

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्याऐवजी आता भाजप आणि शिंदेसेना असे सरकार स्थापन होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवासांपासून कोणतेही वक्तव्य किंवा टि्वट न करणारऱ्या राज ठाकरे यांचे टि्वट आले आहे.

Published by : Team Lokshahi

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आलं आणि उध्दव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राजीनामा दिलाय. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्याऐवजी आता भाजप आणि शिंदेसेना असे सरकार स्थापन होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवासांपासून कोणतेही वक्तव्य किंवा टि्वट न करणारऱ्या राज ठाकरे यांचे टि्वट आले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या टि्वटमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यांवर निशाना साधला आहे. राज यांनी हिंदीतून टि्वट केले आहे. या टि्वटमध्ये राज यांनी म्हटले आहे की,

जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य

को ही अपना निजी कर्तृत्व मानने

लगता है, उस दिन से पतन का

प्रवास शुरु होता है.

राज यांच्या या टि्वटची आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेची काय भूमिका राहणार यावर राज्याचे लक्ष लागले आहे.

पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते-मुख्यमंत्री शिंदे

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न! 'जयश्री वहिनी ह्या माझ्याच उमेदवार त्यांना निवडून द्या' विशाल पाटील यांच आवाहन

Healthcare: पचनाच्या समस्यांवर घरगुती उपाय, 'हा' आहे सोपा मार्ग

Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात

Sharad Pawar यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत