'हर हर महादेव' सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा केला. राज ठाकरे यांनी हरहर महादेव सिनेमात डबिंगसाठी तब्बल 17 दिवस काम केलं आहे. या मुलाखतीत बोलत राज ठाकरे यांनी अनेक आठवणींना सुद्धा उजाळा दिला आहे. या दरम्यान, बोलत असताना राज ठाकरे यांनी फडणवीस आडनावाचा अर्थ सांगितला आहे.
काय सांगितला राज ठाकरे यांनी फडणवीस शब्दाचा अर्थ?
राज ठाकरे यांनी मुलाखतीत काही नावांचा उल्लेख करत त्यांची नावे कशी पडली ? त्या नावांचा अर्थ काय ? याबद्दल राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितल आहे. तेव्हा ते म्हणाले की, चिटणीस हे नाव जे चिठ्ठी लिहायचे त्यांचे नाव चिटणीस झाले आहेत. पारस नविस म्हणजे पर्शियन लिहिणारा त्याचे नंतर पारसनीस झाले. तसे फडणवीस या शब्दाचा अर्थही सांगितला. फड म्हणजे फळा, फळ्यावर लिहिणारा फडणवीस. असा अर्थ यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितला आहे.
सत्ता हातामध्ये आली तर हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवेन
माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला पहिल्या सभेला जे मी बोललो होतो मी महाराजांना स्मरण करून खरंच मी शपथपूर्वक सांगतो की, जर ही हे राज्य माझ्या हातामध्ये आलं तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवीन असे राज ठाकरे म्हणाले आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवने सहज शक्य आहे. आता नाही पण उद्या, परवा कधी ना कधी हे नक्की घडेल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.