Raj Thackeray devendra faadnvis Team Lokshahi
राजकारण

राज ठाकरेंनी केलं फडणवीसांचं कौतुक, शिंदेंना दिले दोन सल्ले

फडणवीसांच्या दु:खावर राज ठाकरेंकडून फुंकर

Published by : Shubham Tate

Raj Thackeray devendra faadnvis : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाच वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला. पण यातच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रात देवेंद्र फडवणीस यांचं त्यांनी अभिनंदन केलेय. (raj thackeray letter to devendra faadnvis over new government oath ceremony)

राज ठाकरे यांचं फडणवीसांसाठी खास पत्र

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो....

ठाकरेंनी शिंदेंना दिले दोन सल्ले

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत राज ठाकरेंनी त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. हुशारीने पावले टाका. देवाने तुम्हाला ही संधी दिली आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या कामगिरीने ते सिद्ध कराल. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर पडदा टाकत ट्विट केले होते की, जेव्हा कोणी चांगले नशीब हे आपले वैयक्तिक कर्तृत्व समजण्याची चूक करतो, तेव्हा त्याचा अधोगतीचा प्रवास सुरू होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपात फ्रंटफूटवर येऊन राज ठाकरे फार काही करत नसले तरी या काळात एकनाथ शिंदे यांच्याशी दोनदा बोलणे झाल्याचे बोलले जाते.

ठाकरेंनी केलं फडणवीसांचं कौतुक

त्याशिवाय पक्षाच्या निर्णायासाठी घेतलला निर्णय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही घालून दिलेला वस्तुपाठ देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखा आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान