राजकारण

“अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेले, अन्…वीजबिल माफीचा निर्णय बदलला”

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशी टोलनाक्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले होते. यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाढीव वीजबिलांवरून सरकारवर निशाणा साधला.

वाढीव वीजबिलांचा मुद्द्याला मनसेने तोंड फोडलं. नागरिकांना याची जाण आहे. वीज कंपन्यांकडून वाढीव बिलं सर्वांनाच येत आहेत. तुम्हाला लॉकडाऊनमध्ये त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही, त्यामुळे तुम्ही जर नागरिकांना त्रास देणार असाल तर कसं होईल?, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला.

अदानी शरद पवारांच्या घरी

राज्यपालांची या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर मी शरद पवार यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहा आणि ते माझ्याकडे पाठवा. मात्र मी शरद पवारांना भेटण्याआधीच अदानी यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर सरकारने वीजबिलं माफ करण्याची भूमिका बदलली. त्यामुळे मी भेटण्याचा प्रश्नच उरला नाही, असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे.

दोन कानाखाली बार काढायचे होते

३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद पार पडली. यावेळी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील उस्मानी याने हिंदूंवर केलेल्या वक्तव्यावरून हिंदूत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. अखेर आयोजकांनी या वक्तव्यावर माफी मागितली. मात्र या प्रकरणावर बोलताना, त्याच्या दोन कानाखाली बार काढायचे होते, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. कानाखाली लावली असती तर हे बोलण्याची हिंमत नसती झाली,असे ते म्हणाले. मात्र त्याला कोणीतरी बोलायला लावल्याचा संशय येतोय, असेही ठाकरे यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन