Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

Raj Thackeray यांचं शिवसेनेमुळे पुनरागमन?

Published by : Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) शनिवारी पुण्यावरुन औरंगाबादला शनिवारी पोहचले आहे. आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत गरजणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi)ते घेरणार आहेत. गुढीपाडव्याला झालेल्या सभेनंतर राज ठाकरे यांच्या मागे भाजप असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच राज यांच्या हिदुत्वाच्या अजेंडावर चर्चा होऊ लागली आहे.

राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा हा अचानक झालेला नसून जाणीवपूर्वक केलेला हा मनसेच्या राजकीय विस्ताराचा भाग असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. हिंदुत्वावर आधारित राजकारणामुळे अमराठी मतदारांमध्येही मनसेची स्वीकारार्हता वाढेल, असा विश्वास आहे. मुंबईत 26% मराठी मतदार आहेत, तर उर्वरित 64% उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर मतदार आहेत. त्याचवेळी, यामागचे आणखी एक मोठे कारण म्हणजे मनसेची उत्तर भारतीय विरोधी पक्ष अशी प्रतिमा धुवून काढण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच ते लवकरच अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येत मोठी सभा घेतली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून दहा हजार व उत्तर प्रदेशातील ४० ते ५० हजार जण उपस्थित राहणार असल्याची तयारी सुरु आहे.

Raj Thackeray

राज ठाकरे काही वर्षे शांत राहिल्यानंतर सध्याच्या राजकीय स्थितीचा फायदा घेण्याची संधी त्यांना शिवसेनेने दिली. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सरकार चालवत आहेत.शिवसेनेने एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने त्यांचे स्वतःचे समर्थकही अस्वस्थ होते. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे शिवसेनेला हिंदुत्वाबाबतची भूमिका मवाळ करावी लागली. अलिकडच्या काळात लाऊडस्पीकरवरून अजानला बंदी ते हनुमान चालिसाच्या पठणाच्या मुद्द्यावरून शिवसेना दि्वधा स्थितीत आली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result