राजकारण

मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यापालांना इशारा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात वातावरण तापलं असतानाच आता मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी ट्विट केलंय.

Published by : Team Lokshahi

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा राज्यपालांना दिला आहे. यासंदर्भातील एक पत्रच त्यांनी ट्विट केले आहे.

कोश्यारींची होशियारी? असे म्हणत राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, असे राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. या वक्तव्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले असून राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

ठाण्यात राजकीय पक्षांची उमेदवारी अर्जासाठी लगबग

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंसाठी यंदा वरळी कठीण? Vidhan Sabha