राजकारण

आमदार अपात्रतेप्रकरणी याचिकांवर एकत्रित सुनावणीवर नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांच्या एकत्रित सुनावणी करण्यावर विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी झाली. याप्रकरणी नार्वेकरांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकूण ३४ याचिकांच्या मिळून ६ याचिका करत एकत्र सुनावणी करणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे.

ठाकरे गटाने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, शिंदे गटाने या मागणीस विरोध केला होता. यासंबंधी आज राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टात सादर केलेली कागदपत्रं माझ्यासमोर सादर करा. कागदपत्रे सादर करण्यास सांगितले तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवता असं चालणार नाही, अशा शब्दात राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला सुनावलं आहे. त्याचबरोबर 25 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यास यावेळी सांगण्यात आलं आहे.

34 याचिका एकत्र करून 6 याचिकांवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचंही नार्वेकरांनी सांगितले आहे. वेगवेगळ्या कारणांनुसार याचिका एकत्र केल्याचं नार्वेकरांनी आजच्या सुनावणीत म्हणाले आहेत. वेगवेगळ्या गटांत याचिका दाखल केल्या आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या दिवशी सुनावणी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या सहा कारणांमध्ये केले गट

- वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस गैरहजर राहणे

- दुसऱ्या बैठकीस गैरहजर राहणे

- विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी मतदान करणे

- बहुमत चाचणीवेळी झालेले मतदान

- भरत गोगावले यांनी दाखल केलेली याचिका

- अपक्ष आमदारांसंदर्भातील याचिका

Pandharpur : आज पंढरपुरात धनगर समाजाचा निर्धार मेळावा

Mumbai University Senate Election : सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान, कोण मारणार बाजी?

दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा 'या' दिवशी राहणार बंद

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान प्रकरण; राहुल गांधींवरील सुनावणी आता विशेष न्यायालयात होणार

Ujjwal Nikam : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले...