मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मोठं विधान केले आहे. 31 तारखेपर्यंत निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असून कायदेशीर निर्णय घेईन, असे आश्वासन नार्वेकरांनी दिलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान राहुल नार्वेकर माध्यमांशी बोलत होते.
राहुल नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय लवकर घेण्याचा प्रयत्न आहे. 31 तारखेपर्यंत निर्णय व्हावा असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितले आहे आणि माझाही असाच प्रयत्न आहे. अधिवेशन काळात सुनावणी घेऊन निश्चित लवकर निर्णय घेईल. कायदेशीर निर्णय होईल असे मी सगळ्यांना आश्वासित करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, बाबासाहेबाना लाखो बांधवांसोबत मी सुद्धा पुण्यस्मृतीस अभिवाद करण्यासाठी आलो आहे. देशाला संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जगातील संविधान प्राप्त करून दिले अशा बाबासाहेबांप्रती आपली आत्मीयता आणि अत्यंत महत्वाच्या व्यक्तीसाठी अभिवादन करू शकलो हे माझं भाग्य समजतो, असेही नार्वेकर म्हणाले आहे.
दरम्यान, सभागृहाचे कामकाज असो किंवा राज्य शासन चालवायचे असो हे सगळे संविधानावर चालते. मी जनतेला आश्वासीत करू सांगतो की संविधानाने दिलेल्या तरतुदींची कुठेही पायमल्ली होणार नाही. नियमानुसार सभागृह आणि संविधानाचे आदर राखत काम चालवणार असल्याचेही नार्वेकरांनी म्हंटले आहे.